- To be respected for your values and beliefs, any special preferences, cultural needs, and responding to requests for spiritual needs.
- To be respected for your personal dignity and privacy during examination, procedures and treatment.
- To be protected from neglect or abuse.
- To be treated patient information as confidential.
- To refusal of treatment.
- To seek an additional opinion regarding clinical care.
- To obtain informed consent from you before the transfusion of blood and blood components, anaesthesia, surgery, initiation of any research protocol and any other invasive/high-risk procedures/treatment.
- To have information on the expected cost of the treatment.
- To have access to your clinical records.
- To have information on the name of the treating doctor, care plan, progress and information on their health care needs.
- To determine what information regarding your care would be provided to self and family.
- To have education to make informed decisions and to be involved in the care planning and delivery process.
- To have information and education in a language that you can understand about your healthcare needs.
- To have non-discrimination in treatment on the basis of clinical/health condition, religion, gender, age, sexual orientation, linguistic or geographical/social origin.
- To receive medical advice and treatment that fully meets the currently accepted standards of quality of health care.
- To complain and be informed on how to voice a complaint.
तुमचे अधिकार
- तुमची मूल्ये आणि श्रद्धा, कोणत्याही विशेष प्राधान्यकृत बाबी, सांस्कृतिक गरजा यांचा आदर करण आणि आध्यात्मिक गरजांच्या पूर्ततेसाठी प्रतिसाद देणे.
- शारीरिक तपासणी, प्रक्रिया आणि उपचारादरम्यान तुमच्या वैयक्तिक प्रतिष्ठेचा आणि गोपनीयतेचा आदर केला जाणे.
- दुर्लक्षित व्यवहार किंवा गैरवर्तनापासून संरक्षण मिळवणे.
- उपचार घेणाऱ्या रुग्णाची माहिती गोपनीय ठेवणे.
- उपचार नाकारणे.
- वैद्यकीय उपचारांसंबंधी अतिरिक्त मत घेणे.
- रक्त आणि रक्त घटक चढविण्यापूर्वी, अॅनेस्थिशिया, शस्त्रक्रिया, कोणतीही संशोधन प्रक्रिया आणि अन्य कोणतीही इजा होऊ शकणारी / उच्च जोखीम असणारी प्रक्रिया / उपचार करण्यापूर्वी तुमच्याकडून सूचित संमती मिळविणे.
- उपचाराचा अपेक्षित खर्च माहिती असणे.
- स्वतःचे वैद्यकीय अहवाल (मेडिकल रिपोर्टस) पाहता येणे.
- उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे नाव, उपचार योजना, स्वास्थ्यविषयक प्रगती आणि आरोग्यदृष्ट्या वैद्यकीय गरजांची माहिती असणे.
- आरोग्याच्या काळजीसंबंधी माहिती स्वतः रुग्णाला आणि कुटुंबाला दिली जाणे.
- संपूर्ण माहिती जाणून त्यानुसार निर्णय घेणे आणि आपल्या आरोग्यासंबंधी काळजीचे नियोजन व त्याचे पालन करण्याच्या प्रक्रियेत सहभागी होणे.
- स्वतःच्या आरोग्यविषयक गरजांविषयी समजेल अशा भाषेत माहिती आणि शिक्षण मिळवणे.
- वैद्यकीय/आरोग्यविषयक स्थिती, धर्म, लिंग, वय, लैंगिक भिन्नता, भाषिक किंवा भौगोलिक/सामाजिक परिस्थितीच्या आधारावर उपचारात भेदभाव न होणे.
- आरोग्य सेवेच्या गुणवत्तेसंबंधी सध्याच्या स्वीकृत मानकांची पूर्णपणे पूर्तता करणारे वैद्यकीय मत आणि उपचार प्राप्त करणे.
- तक्रारी / सूचना मांडणे आणि तक्रारी / सूचना कशा मांडाव्यात याची माहिती मिळविणे.